Maharashtra State Election Commission Press Conference
esakal
राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. सोशल मीडियावर परिपत्रक जारी करत त्यांनी या संदर्भात माहिती दिली. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे विरोधकांकडून या निवडणुका घेण्याला विरोध होतो आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोग निडवणुकीचा पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.