ola uber rapido
sakal
मुंबई : महाराष्ट्रातील अॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक, जबाबदार आणि नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन अँग्रीगेटर धोरण लागू केले आहे. ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अॅग्रीगेटर कंपन्यांना शासनाने निर्धारित केलेल्या नियम व अर्टीचे पालन करूनच व्यवसाय करणे आता अनिवार्य करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.