पुणे - ‘राज्य सरकार कर्जमाफीबाबत दिलेला शब्द फिरविणार नाही. कर्जमाफी कधी करायची, यासंदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत त्यामुळे याबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले..सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘वारकरी भक्तियोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. आळंदीजवळील मोशीतील प्रस्तावित कत्तलखान्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘विकास आराखड्यात आळंदीजवळ मोशीमध्ये कत्तलखान्याचे आरक्षण दाखविले आहे..कोणत्याही परिस्थितीत आळंदीजवळ कत्तलखाना करता येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वत: दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये किंवा त्याजवळ मोशीत अशाप्रकारे कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.’.पालखी सोहळ्यादरम्यान आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी वारकरी, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांना केलेल्या दमदाटीच्या प्रकरणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पालखी सोहळा हा अतिशय आनंददायी आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी आहेत. परंतु, भविष्यात असे प्रकारे घडू नयेत, यासाठी संबंधितांशी चर्चा करण्यात येईल.’.जागतिक शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील विद्यापीठे पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये असावी, असा प्रयत्न होत आहे. त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चालली आहे, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले..विसर्गाबाबत पूर्ण नियोजनराज्यातील विविध धरणे आणि विशेषत: सांगली, कोल्हापूर येथील प्रकल्प लवकर भरत आहेत, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय नियोजन केले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. धरणातील विसर्ग कधी सुरू करायचा, कधी बंद करायचा यासंदर्भात पूर्ण नियोजन करण्यात आले आहे..शेजारील राज्यांशी समन्वय साधण्यात आला आहे. त्या-त्या राज्यांमध्ये पावसाळ्याच्या पूर्ण कालावधीकरिता संबंधित अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे. त्या अभियंत्यांमार्फत योग्य समन्वय साधला जात आहे. अलीकडच्या काळात निसर्गाचा फारसा भरवसा देता येत नाही. पण, राज्य सरकारने पूर्ण नियोजन केले आहे.’.प्राध्यापक भरती लवकरचराज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरतीच्या प्रक्रियेसाठी सर्व प्रकारच्या मान्यता दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.