मुंबई - नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी पुढील पाच वर्षांत शेती क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील निवडक जिल्ह्यांत ‘पोकरा’ योजनेतून शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येतात. आता त्याच धर्तीवर उर्वरित शेतकऱ्यांसाठी भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जातील.