Marriage Beuro : ‘अंनिस’तर्फे राज्यस्तरीय वधू-वर सूचक केंद्र

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी उपक्रम.
marriage
marriageesakal

पुणे - आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच सोलापूरमध्ये झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीसाठी राज्यभरातून १७५ अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये १९ जिल्ह्यांतून जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांक’चे प्रकाशन करून बैठकीचे उद्‍घाटन झाले.

या प्रसंगी मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद यांचे ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर भाषण झाले. राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप सर्जन आणि बार्शीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद, ग्रामीण कथाकार डॉ. अर्जुन व्हटकर यांच्या उपस्थितीत झाला.

तसेच २०२४ हे वर्ष ‘प. रा. आर्डे प्रबोधन प्रशिक्षण वर्ष’ जाहीर करून पुढील सहा महिन्यांत प्रामुख्याने सोलापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, खेड या ठिकाणी दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजन करणे, तसेच मुंबई, बीड, अहमदनगर, पालघर, धाराशीव, रत्नागिरी या जिल्ह्यांत शिक्षक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचाही निर्णय यावेळी झाला.

सोलापूर शहरातील अंनिसच्या देणगीदारांचा आणि जाहिरातदारांचा सन्मान ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ‘अंनिस’मध्ये विशेष काम करणाऱ्या रमेश माने, शंकर कणसे, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, भगवान रणदिवे, गीता हसूरकर या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाचा अन्वयार्थ’ यावर मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, फारुख गवंडी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या निकाल पत्रामध्ये न्यायमूर्तींनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचेही ठरले. या बैठकीत राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, प्रा. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रशांत पोतदार,फारुख गवंडी, प्रकाश घादगिने, निळकंठ जिरगे आदींनी भाग घेतला.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात अपील करणे. निकालाचा मराठी अनुवाद करून तो लोकांपर्यंत पोहोचवणे.

  • ‘नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ हे अभियान २० जून ते २० ऑगस्ट दरम्यान सुरू करणे. त्यात डॉ. दाभोलकरांच्या १५ पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या साठ हजार प्रती वितरित करणे.

  • धार्मिक स्थळावर दैवी उपचार घेणाऱ्या मानसिक रोग्यांसाठी ‘दवा आणि दुवा प्रकल्प’ सुरू करणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com