बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर राज्यात तगडा बंदोबस्त; अवैध प्राण्यांच्या वाहतूकीवर जबर कारवाई होणार

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

राज्यातील 'बकरी ईद'च्या पार्श्वभुमीवर अवैध प्राण्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहे.

मुंबई ः राज्यातील 'बकरी ईद'च्या पार्श्वभुमीवर अवैध प्राण्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहे. कायद्यानुसार प्राण्यांची वाहतूक करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करने आवश्यक आहे. मात्र, ओव्हरलोड प्राण्यांची वाहतूक, कत्तलीसाठी अवैध प्राण्याची वाहतूक करत असल्यास अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कोव्हिड रुग्णांचे नाव न जाहीर करण्यावर न्यायालय ठाम; बहिष्काराचा धोका असल्याचे दिले कारण...

राज्याच्या काही भागात अवैध कत्तलखाने चालविले जातात. त्याठिकाणी अवैधरित्या होणारी प्राण्यांची वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यात यावी, परराज्यातून येणाऱ्या सक्षम जनावरांच्या बाबतीत क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून कायदेशीर तरतूदीचा भंग केल्याबद्दल मोटार वाहन अधिनियम व तरतुदीनुसार संबंधीत दोषी वाहनांवर कारवाई करण्याचे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सीमा तपासणी नाक्यांवरील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या यासारख्या विषयांमधील कायदे व नियमांचे पालन करून अशा वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याची खात्री करावी तसेच सक्षम प्राधिकरण तथा एॅन्युअल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडिया यांनी किंवा केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी    व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेल्या प्रणापत्राची प्रत सुद्धा काटेकोरपणे तपासण्यात येणार आहे. 

मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळणार का? शहराला पाणीपुरवठा तलावांमध्ये जुलै अखेरीस 'इतका' पाणीसाठा

अवैध पाण्यांची वाहतूक आढळल्यास अशा वाहनांवर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करून प्राण्यांना योग्य ठिकाणी सुद्धा सोडण्यात येणार आहे. तर शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधवा तसेच स्थानिक पोलीस विभाग, वाहतूक पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्राणी कल्याण संस्थेचे स्वयंमसेवकांच्या उपस्थितीत एकत्रीतपणे कारवाई मोहिम राबवण्याचे आदेश सुद्धा परिवहन विभागाने दिले आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, पण 'हा' आहे मुंबईतील कोरोनाचा धगधगता हॉटस्पॉट

मुंबई उपनगरात विशेष लक्ष
परराज्यातून सुदृढ प्राण्यांची वाहतूक केली जाते. याच प्राण्यांना इजा अपंग करून त्यांचे कत्तल योग्य प्रमाणपत्र प्राप्त केले जाते. त्यानंतर या प्राण्यांची वाहतूक केली जाते. मुंबई येथील कत्तलखाण्यात येणारी जनावरे पणवेल व नवी मुंबई भागात आणून त्या जनावरांचे प्रमाणपत्र घेतले जाते. त्यानंतर प्राण्यांची कुर्बाणी किंवा कत्तल केली जाते. त्यामूळे मुंबई उपनगरातील सीमा तपासणी नाक्यांवर आणि इतर रस्त्यांवर कडकपणे तपासणी करून कारवाई करण्याच्या सुचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहे.

--------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state transport commissioner has ordered action against those transporting illegal animals on the backdrop of bakari Eid in the state.