ST कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार? CM शिंदेंनी बोलावली कामगारांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde
ST कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार? CM शिंदेंनी बोलावली कामगारांची बैठक

ST कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार? CM शिंदेंनी बोलावली कामगारांची बैठक

राज्यातल्या एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एसटी कामगारांच्या मागण्यांविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde : "नवे उद्योग राज्यात येतायत; केंद्र सरकार प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी देत आहे"

सामने दिलेल्या वृत्तानुसार, एसटी कामगारांची महत्त्वाची बैठक दुपारी अडीच वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असतील. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय काही ज्यादा गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde : माणसांच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता 'घड्याळा'त अडकणार

एसटीच्या सेवेत लवकरच ९०० एसी मिडी बस येण्याविषयीचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर होऊ शकतो. यावेळी नव्या सीएनजी वाहनांऐवजी २००० डिझेल गाड्या दाखल होण्याविषयीही चर्चा होणार आहे. शिवाय नव्या इलेक्ट्रिक गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यताही या बैठकीमध्ये वर्तवली जात आहे.