राज्यातील शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू, मंदिरेही खुली

चार ऑक्टोबरला घंटा वाजणार; प्रार्थनास्थळी नियमांचे पालन हवेच
शाळा सुरू
शाळा सुरूGallery

मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरू लागला असताना आज राज्य सरकारनेही शाळा आणि प्रार्थनास्थळांची दारे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतरच शिक्षण विभागाने शाळांची घंटा वाजविण्याचे ठरविले आहे . ग्रामीण भागांतील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळेही खुली केली जातील.

शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. जो ग्रामीण आणि शहरी भाग कोरोनामुक्त आहे तिथेच शाळा सुरू करण्यात येतील. तत्पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने आक्षेप घेतल्याने गेल्या महिन्यातच शाळा सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला होता. अखेर या विभागानेच लहान मुलांसाठी नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी नियमावली तयार केल्यानंतर शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री गायकवाड यांनी सांगितले की, ‘‘ सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात येत आहे. पालकांनाही मुलांना शाळेत पाठवायचे आहे. मुले शाळेत जात नसल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम होण्याची भीती आहे. दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास शाळा बंद करण्याचे अधिकारही मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. कोविडमुक्त शाळा सुरू व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी देखील शाळांची करतील.’’

शाळा सुरू
पिंपरी-चिंचवड शहरात आज ६९ केंद्रांवर लसीकरण

प्रार्थनास्थळी नियम पाळावे

प्रार्थनास्थळांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘ धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर राखणे, जंतुनाशकांचा वापर करणे अनिवार्य आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीने जबाबदारीचे भान ठेवावे.’’ दरम्यान नवरात्रात ठिकठिकाणी गरब्यांचे आयोजन केले जाते याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. दुसरीकडे प्रार्थनास्थळे खुली झाल्याने अनेकांना रोजगार मिळू शकेल.

डिजिटल शाळांबाबत सादरीकरण

आज महाराष्ट्रातील शाळा डिजिटल करण्यासंबंधी महाराष्ट्र ज्ञानविज्ञान मंडळाच्या विवेक सावंत यांनी सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही यावेळी हजर होते. महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विषयक कामांची जबाबदारी एमकेसीएलकडे सोपविण्याबद्दल विचार सुरू आहे.

ही काळजी घ्यावी

  • विद्यार्थ्यांना दोन आठवडे शिकवणी नको

  • कोरोना होऊन गेलेल्यांना वेगळी वागणूक नको

  • शाळेतून घरी आल्यावर विद्यार्थ्यांनी अंघोळ करावी

  • सर्वांना वर्गामध्ये मास्क घालणे बंधनकारक

  • विद्यार्थ्यांनी शाळेत शक्यतो पायी चालत यावे

  • स्कूल बसमध्ये एका सीटवर एकजण हवा

  • प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरु करावे

  • शक्य असल्यास पूर्णवेळ क्लिनिक सुरू करावे.

  • शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित तापमान तपासावे

  • सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात

  • गृहपाठ शाळेत किंवा ऑनलाइन घ्यावा

  • शारीरिक संपर्क होणारे खेळ घेण्यात येवू नयेत

  • खेळताना थकलेल्या मुलाकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे

शाळा सुरू
मोदी-बायडेन यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

नवरात्रीपासून प्रार्थनास्थळे खुली

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे सात ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे . मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये घट होत असली तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com