
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. कोरोनाविरोधातील लढाईत अधिक सहकार्याने लढण्यास कटिबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मोदी आणि त्यांच्यात थेट चर्चा झाली.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. कोरोनाविरोधातील लढाईत अधिक सहकार्याने लढण्यास कटिबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मोदी आणि त्यांच्यात थेट चर्चा झाली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोनाविरोधातील लढाई, जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे, दहशतवादाविरोधात एकत्र लढणे, हिंद-प्रशांत प्रदेशातील शांततेसाठी प्रयत्न करणे अशा मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्याचे निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
यूएन प्रमुखांची आशियाई नेत्यांना साद; उठाव मागे घेतला जावा म्हणून एकत्रित कृतीचे आवाहन
आज झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशात संचार स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि प्रादेशिक एकात्मता टिकविण्यासाठी एकमेकांना अधिक सहकार्य करण्याचे मान्य केले. पर्यावरण बदलाच्या मुद्द्यावरही गंभीरपणे काम करण्याचा निश्चय दोन्ही देशांनी व्यक्त केला. म्यानमारमधील परिस्थितीवरही दोघांनी चर्चा केली.
ट्रम्प यांच्याविरोधातील दुसऱ्या महाभियोगास सुरवात; आजपासून होतेय सुनावणी
२० जानेवारील शपथ घेतल्यानंतर बायडेन यांनी नऊ देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. परंपरेप्रमाणे, अमेरिकेचे नवे अध्यक्ष सर्वप्रथम कॅनडा आणि मेक्सिको या शेजारील देशांच्या प्रमुखांशी चर्चा करतात. यानंतर बायडेन यांनी ‘नाटो’ करारातील देशांबरोबर संवाद साधला.
Edited By - Prashant Patil