
महिलांसाठी देशात ३०० एक थांबा केंद्रे
मुंबई : महिलांचे संरक्षण आणि सुरक्षितता यासाठी देशात महिलांसाठी सध्या ७०४ ‘वन स्टॉप सेंटर’ अर्थात ‘एक थांबा केंद्रे’ कार्यरत आहेत. याच प्रकारची आणखी ३०० एक थांबा केंद्रे लवकरच सुरु करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी दिली.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने आज पश्चिम विभागातील राज्यांची क्षेत्रीय परिषद मुंबई येथे आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांचे संरक्षण आणि सुरक्षितता याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, ‘एक थांबा केंद्रांच्या माध्यमातून महिलांसाठीच्या हेल्पलाइनसोबत सहसंबंध प्रस्थापित करण्यात येत आहेत. देशातील सुमारे ७० लाख महिलांना या केंद्रांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारतर्फे मदत पुरविण्यात आली आहे.
खासगी तसेच सरकारी जागांच्या परिसरात, कुटुंबामध्ये, समाजात तसेच महिलांच्या कार्यस्थळी होणाऱ्या हिंसेला बळी पडलेल्या महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने ही ‘एक थांबा केंद्रे’ सुरु करण्यात आली आहेत. २०१४ ते २०२१ या पाच वर्षाच्या काळात महिलांची सुरक्षितता आणि संरक्षण करण्याच्या हेतूने निर्भया निधीच्या माध्यमातून नऊ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
Web Title: Stop Centers Women Country Information Union Minister Women And Child Welfare Smriti Irani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..