esakal | किल्ले ही महाराष्ट्राची शान
sakal

बोलून बातमी शोधा

Story on the occasion of Shri Chhatrapati Shivaji Maharaj coronation day

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत आहे.  आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत.

किल्ले ही महाराष्ट्राची शान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत आहे.  आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. त्यात १३ सागरी किल्ले आहेत. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांच्या डेांगरमाथ्यांवर पाण्याची झरे आहेत.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र, कर्नाटक़, तामिळनाडू व गोवा या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. हे किल्ले महाराष्ट्रासाठी एक अनमोल ठेव आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डेांगरी किल्ला, भुईकोट किल्ला आणि सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजे शिवनेरी किल्ला. राजगड हि मराठी राज्याची पहिली राजधनी आहे. त्यानंतर रायगड झाली. यावेळी या विषयावर बोलताना इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण म्हणाले, श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही अपूर्व अशी घटना आहे. त्यामुळे एका नव्या युगाची सुरुवात भारतात झाली. मुस्लिम सत्तेच्या गुलामगिरीतून मराठी रयतेस स्वतंत्र सत्ता राज्याभिषेक रुपाने महाराजांनी निर्माण केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज हा हिंदु राजा पुन्हा होवू शकत नाही.

रायगड किल्ल्यावरच का केला जातो राज्याभिषेक
महाराष्ट्राच्या किल्ल्यातील हा सर्वात महत्त्वाचा किल्ला मानला जातो.  या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे. राज्यातील रायगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे.  रायगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. रायगड किल्ला हा अतिशय बुलंद, उंच किल्ला आहे.  या किल्ल्यावर एकही गवत उगवत नाही. महाराजांनी या किल्ल्यावरच राजधानी करायची ठरवली. गडाच्या पश्‍चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडेच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी महाराजांचा पुतळा हे रायगडावरील मुख्य आकर्षण आहे. यामुळे रायगड किल्ल्यावरच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. तसेच याच किल्ल्यावर राजेंनी त्यांचा शेवटचा श्‍वास घेतला होता. 

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व
महाराष्ट्रातील गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघषार्ची प्रतिके आहे. महाराष्ट्रातील किल्ले आपल्या इतिहासाची, शौर्याची सोनेरी पाने तितकीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे ३६५ किल्ले आहेत. 

महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोकगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड आदी महत्त्वाची किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होती.

सिंधुदुर्ग किल्ला
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. हा किल्ला उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला होता. हा किल्ला उभारताना महाराजांचे हातभार लागले आहे. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायभरणी झाली.

महाराजांनी बांधलेले किल्ले
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा, शिवनेरी, रायगड, विशाळगड, तोरणा, राजगड, सिंहगड, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड आणि कडासरी हे किल्ले बांधले.

काय म्हणाले महाराज
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी असे म्हटले होते की, जसे शेतकरी आपल्या शेतातील माळ्याचे रक्षण करतो. त्याच पध्दतीने किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारुन बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्याची आहे. म्हणून प्रत्येकांनी किल्ल्यांचे रक्षण केलेच पाहिजे.