esakal | कडक लॉकडाउन वाढणार 15 मेपर्यंत? "आपत्ती व्यवस्थापन'चा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

कडक लॉकडाउन वाढणार 15 मेपर्यंत? "आपत्ती व्यवस्थापन'चा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : "ब्रेक द चेन'नंतर मागील 12 दिवसांत (15 ते 26 मे) राज्यात 65 हजारांच्या सरासरीने सात लाख चार हजार रुग्ण वाढले आहेत. तर सहाशेच्या सरासरीने दररोज मृत्यू झाले आहेत. आता परिस्थिती सुधारू लागली असून, सोमवारी (ता. 26) मागील 24 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली. परंतु, कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी 15 मेपर्यंत निर्बंध कायम ठेवावेत, असा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे. तो प्रस्ताव 29 एप्रिलपर्यंत राज्याचा पुन्हा एकदा जिल्हानिहाय आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

अंतर्गत राज्यात 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने जिल्हाबंदीही लागू करण्यात आली आहे. तरीही मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, जळगाव, बीड, लातूर, यवतमाळ, नांदेड यासह अन्य शहरे व ग्रामीण भागात नियमांचे पालन तंतोतंत न करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मागील 13 दिवसांत सोलापूर शहरातील बेशिस्तांकडून पोलिसांनी 27 लाखांहून अधिक दंड वसूल केला असून, महापालिकेनेही दंडात्मक कारवाई केली आहे. तर ग्रामीण पोलिसांनीही लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्तांवर वॉच ठेवून पोलिसांमार्फत कारवाया वाढवाव्यात, अशी सूचनाही आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारला केली आहे.

हेही वाचा: बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू? प्रशासनाने फेटाळले आरोप

कडक संचारबंदी आणखी 15 दिवसांनी वाढविल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि तोपर्यंत लसीकरणाचा वेगही वाढेल, ही बाब त्यांनी प्रस्तावात नमूद केल्याचेही सूत्रांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 29 अथवा 30 एप्रिलला राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून, परिस्थितीचा आढावा घेऊन ते पुढील घोषणा करतील, असेही सांगण्यात आले.

15 ते 26 एप्रिलपर्यंतची स्थिती...

  • कडक संचारबंदीनंतर (12 दिवसांत) 29 लाख 35 हजार 366 संशयितांची कोरोना टेस्ट

  • राज्यात मागील 12 दिवसांत आढळले सात लाख तीन हजार 872 कोरोनाबाधित रुग्ण

  • कडक लॉकडाउनच्या काळात राज्यातील सहा लाख 42 हजार 740 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  • मागील 12 दिवसांत सहा हजार 131 रुग्णांचा मृत्यू तर 54 हजार 710 ऍक्‍टिव्ह रुग्ण वाढले

  • "ब्रेक द चेन'नंतर बेशिस्तांना चार कोटींचा दंड; ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे मंडळात रुग्णवाढ कायम

  • 15 मेनंतर संसर्ग कमी होईल, आरोग्य विभागाला विश्‍वास; कडक लॉकडाउन वाढीचा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला प्रस्ताव

  • 29 एप्रिलला मुख्यमंत्र्यांना पाठवला जाईल प्रस्ताव; परिस्थिती पाहून "ब्रेक द चेन'च्या (कडक लॉकडाउन) वाढीचा निर्णय

loading image