नंदोरी (जि. वर्धा) - अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर ते राहत असलेल्या परिसरातच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी होती. परंतु, आता संपूर्ण राज्याकरिता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल.
या प्रवेश अर्जानुसार संबंधित विद्यार्थ्याला राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या उच्च माध्यमिकची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे विद्यार्थी कोठेही राहत असला, तरी त्याला संपूर्ण राज्यातील महाविद्यालये प्रवेशासाठी उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.