
सोलापूर : ‘सकाळ’तर्फे आयोजित व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनातून विविध क्षेत्रांची व त्यातून मिळणाऱ्या करिअरची संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणारे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यात २० हून अधिक नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. हे प्रदर्शन हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात शनिवारी (ता.२१) व रविवारी (ता.२२) असे दोन दिवस असणार आहे.
एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अलिफ ओव्हरसिज एज्युकेशनसह प्रायोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’मध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण करिअर मार्गदर्शन या प्रदर्शनातून मिळणार आहे. अकरावी-बारावीसह पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, अभ्यासक्रम तसेच विविध कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसची माहिती यात मिळणार आहे. दहावी-बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना आणि करिअरची दिशा ठरविताना नेमके काय करावे?, कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि करिअरच्या १०० हून अधिक संधीची माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे. या प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सकाळ समूहातर्फे करण्यात येत आहे.
सहभागी संस्था...
एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी
अलिफ ओव्हरसीज एज्युकेशन
संजय घोडावत युनिव्हर्सिटी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, सोलापूर
नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी सोलापूर
डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी
भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर
फ्युएल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन
ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर
व्ही.व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सोलापूर
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर
भारती विद्यापीठ पुणे, अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड सोशल सायन्स, सोलापूर
एमआयटी आळंदी कॅम्पस
सीमएज्यु
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट
अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन
काय? केव्हा? कधी? कुठे?
काय? : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५
कधी? : शनिवार ता. २१ व रविवार ता. २२
केव्हा? : सकाळी १० ते रात्री ७
कुठे?: हुतात्मा स्मृती मंदिर प्रांगण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)
अधिक माहितीसाठी - ९५२७४९३८४४
पहिल्या दिवसापासूनच आमच्या विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करण्यावर
फायदेशीर कारकिर्दीची हमी देणारे शिक्षण पालक व विद्यार्थ्यांना हवे असते. हॉस्पिटॅलिटी हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लवचिक उद्योगांपैकी एक आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयामार्फत चालवली जाणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आमचे लक्ष पहिल्या दिवसापासूनच आमच्या विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करण्यावर आहे. या प्रदर्शनातून सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा व माहिती मिळणार आहे. सकाळने चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.
- नेहा खेडकर, प्राचार्या, श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सोलापूर
‘हे’ प्रदर्शन नक्कीच दिशादर्शक ठरेल
विद्यार्थ्यांना त्यांनी विविध क्षेत्रांची माहिती हवी असते. त्यातून ते आपल्या भविष्यासाठी करिअरची दिशा निवडतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध करिअरची व कोर्सेसची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. विशेषकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक मदत या प्रदर्शनातून होणार आहे. हे प्रदर्शन नक्कीच दिशादर्शक ठरेल.
- डॉ. विनायक धुळप, संचालक, भूशास्त्र संकुल तथा समन्वयक, प्रवेश समिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.