Student's olympic national games | महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Student's olympic national games

Student's olympic national games : महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके

मुंबई : नववी Student's olympic national games स्पर्धा २०२२-२३ उत्तराखंडमधील हरिद्वार येथे २७ ते २९ जुलै कालावधीत घेण्यात आली. यात महाराष्ट्राचा संघ ५१ विद्यार्थ्यांसह सहभागी झाला होता. यात ३८ पदके पटकावत ठाणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डोंबिवली येथील चंद्रकांत पाटकर विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या स्पर्धेत योगा, बुद्धिबळ, कॅरम, कुस्ती, कराटे, कबड्डी, इत्यादी खेळांचा समावेश होता.

हेही वाचा: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वीमर (पॅरालिम्पिक) सुयश जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डोंबिवली येथील चंद्रकांत पाटकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेत ३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य आणि बुद्धिबळ स्पर्धेत १ रौप्य पदक मिळवले. १२ वर्षांखालील मुलांच्या कॅरम स्पर्धेत नील विवेक म्हात्रे याने सुवर्ण, वेदांत अमोल पाटणकर याने रौप्य आणि प्रसाद सुहास माने याने कांस्य पदक पटकावले.

१४ वर्षांखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेत आर्या अमित घाणेकर हिने सुवर्ण, केतकी उमेश मुंडल्ये हिने रौप्य, अवनी अविनाश परब हिने कांस्य पदक प्राप्त केले. १७ वर्षांखालील मुलांच्या कॅरम स्पर्धेत अथर्व विवेक म्हात्रे याने सुवर्ण, लक्ष्य अश्विन परब याने रौप्य पदक मिळवले.

हेही वाचा: ऑलिंपिकचं न पेलणारं ओझं

१२ वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत समृद्धी किरण दामले हिने रौप्य पदक मिळवले. १२ वर्षांखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेत टिटवाळ्याच्या मेरिडिअन शाळेच्या निधी साळुंखे हिने सुवर्ण पदक मिळवले. वेदांत, आर्या, केतकी, समृद्धी हे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. सर्व खेळाडूंचे संघ प्रशिक्षक म्हणून विवेक म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Students Olympic National Games Gold Medals For Students Of Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..