विद्यार्थ्यांना मिळेल ५ ते १२ लाखांचे पॅकेज! करिअरसाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीएससी-सीएस अन्‌ बीसीएचा पर्याय; ‘या’ ठिकाणी नोकरीची संधी

बीसीए कोर्सच्या नवीन विद्यार्थ्यांचा पगार दरवर्षी अडीच ते पाच लाख रुपये असतो. नामांकित कॉलेजमधून शिक्षण झालेल्या आणि प्रोग्रॅमिंग (जसे की पायथॉन, जावा) किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग सारखी कौशल्ये शिकल्यास त्या तरुणांना वार्षिक सहा ते बारा लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते. ‘बीसीए’नंतर ‘एमसीए’ केल्याने पगारात लक्षणीय वाढ होते.
करिअर
करिअरsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा, कोणता अभ्यासक्रम चांगला, कोणत्या अभ्यासक्रमाला बाजारात जास्त मागणी आणि कुठे जास्त पगार मिळू शकतो, याबद्दल विद्यार्थी अनेकदा गोंधळलेले असतात. पण, बीसीए आणि बीएससी संगणक विज्ञान अभ्यासक्रम हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम असून याला आयटी कंपन्या, स्टार्टअप्स आणि सॉफ्टवेअर सेवांमध्ये त्याची मागणी जास्त आहे. बीसीए पदवीधरांना व्यावहारिक कौशल्ये (जावा, पायथॉन, डेटाबेस व्यवस्थापन) शिकवली जातात, ज्यामुळे फ्रेशर्सना लवकर नोकऱ्या मिळतात. यामुळे या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची करिअरसाठी अधिक पसंती आहे.

बीएससी संगणक विज्ञान अभ्यासक्रम

(सी प्रोग्रॅमिंग)

  • सी-प्लसप्लस : ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंगची मूलभूत माहिती.

  • जावा : प्रगत प्रोग्रॅमिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी.

  • पायथॉन : डेटा विश्लेषण, मशिन लर्निंग आणि सोपे कोडिंग.

  • डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम : डेटा (ॲरे, लिंक्ड लिस्ट, स्टॅक, क्यू) व्यवस्थित करणे व समस्या सोडवण्यासाठी अल्गोरिदम शिकावे लागते. मुलाखती कोडिंग व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी हे खूप महत्वाचे आहे.

  • ऑपरेटिंग सिस्टिम्स : संगणक ऑपरेटिंग सिस्टिम्स (विंडोज, लिनक्स) कशा काम करतात, त्यांचे प्रक्रिया व्यवस्थापन, मेमरी व्यवस्थापन व फाइल सिस्टिम्स यांचा अभ्यास असतो.

  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम : डेटा साठवण्यासाठी व व्यवस्थापित करण्यासाठी एसक्युएल, माय-एसक्युएल किंवा ऑरकल अशी साधने शिका. डेटाबेस डिझाइन व क्वेरी लिहिणे शिकवले जाते.

  • संगणक नेटवर्क : नेटवर्किंगची मूलतत्त्वे (लॅन, वॅन), इंटरनेट प्रोटोकॉल (टीसीपी किंवा आयपी), आणि सायबर सुरक्षा.

बीसीए अभ्यासक्रम....

(सी प्रोग्रॅमिंग)

  • सी प्लस प्लस : ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंगची (ओओपी) मूलतत्त्वे (ऑब्जेक्ट्स आणि इनहेरिटन्स).

  • जावा : सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी, ज्याला उद्योगात मोठी मागणी आहे.

  • पायथॉन : डेटा विश्लेषण, वेब डेव्हलपमेंट आणि ऑटोमेशनसाठी (अनेक महाविद्यालयांमध्ये समाविष्ट).

  • वेब डेव्हलपमेंट : एचटीएमएल, सीएसएस आणि जावास्क्रिप्ट.

  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम : सीक्युएल, मायएसक्युएल किंवा ओरकल वापरून डेटा साठवणे, व्यवस्थापित करणे आणि क्वेरी लिहिण्याचे प्रशिक्षण. डेटाबेस डिझाइन आणि डेटा पुनर्प्राप्ती संकल्पना.

  • संगणक नेटवर्क : नेटवर्किंगची मूलतत्त्वे, इंटरनेट प्रोटोकॉल, नेटवर्क सुरक्षा आणि मूलभूत सायबर सुरक्षा संकल्पना असतात.

वार्षिक पॅकेज किती?

बीसीए कोर्सच्या नवीन विद्यार्थ्यांचा पगार दरवर्षी अडीच ते पाच लाख रुपये असतो. नामांकित कॉलेजमधून शिक्षण झालेल्या आणि प्रोग्रॅमिंग (जसे की पायथॉन, जावा) किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग सारखी कौशल्ये शिकल्यास त्या तरुणांना वार्षिक सहा ते बारा लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते. ‘बीसीए’नंतर ‘एमसीए’ केल्याने पगारात लक्षणीय वाढ होते.

कोणता अभ्यासक्रम योग्य आहे?

दोन्ही अभ्यासक्रमांची तुलना केल्यास या अभ्यासक्रमांची मागणी जवळजवळ सारखीच आहे. तथापि, अधिक विद्यार्थी बीसीए अभ्यासक्रमाला प्राधान्य देतात. संगणक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, विद्यार्थी बीटेक अभ्यासक्रमाला प्राधान्य देतात. आयटी क्षेत्रात अशा अनेक पदांवर आहेत, ज्यांच्यासाठी या पदवी असलेल्यांना नोकऱ्या दिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com