Shivsena News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती
Shivsena News
Shivsena Newsesakal

Shivsena News: शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची चारी बाजूने कोंडी केली. पहिल्यांदा ४० आमदार फोडून पहिला धक्का दिला. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले नंतर शिवसेना पक्षच ताब्यात घेतला त्यानंतर खरी शिवसेने शिंदे यांना मिळाली.

शिंदेच्या शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत वर्षानुवर्ष एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी देखील ठाकरेंना राम राम केला.

दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

Shivsena News
Jayant Patil News: राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदे? जयंत पाटील म्हणाले...

सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित बाळासाहेब भवनात पक्ष प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यापूर्वी देखील शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्याच्या घरात फूट पडली आहे, गजानन किर्तीकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला, यानंतर आता देसाई यांच्या घरात फूट पडली आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

कोण आहेत सुभाष देसाई?

सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधित्त्व करत आहेत. 1990 मध्ये पहिल्यांदा सुभाष देसाई हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.

त्यानंतर 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा निवडणुकीत विजयी झाले. 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.

Shivsena News
Ajit Pawar News: CM पदी शिंदे पण फडणविसांनी केला करेक्ट कार्यक्रम, अजित पवारांनी आकडेवारीच दाखली वाचून

तसेच मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्याच काळात मुंबईच्या पालकमंत्रिपदीही त्यांची नियुक्ती झाली.

त्यानंतर 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. २०१९ मध्ये मविआमध्ये देखील त्यांना कॅबिनेट मध्ये संधी दिली होती. 

सुभाष देसाई यांचा राजकीय प्रवास :

- जन्म 12 जुलै 1942 रत्नागिरी जिल्हयात झाला.

- 1966- शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून सहभाग

- मुंबईत गोरेगाव येथे गोरेगाव धर्मादाय संस्था माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन

- अमेरिका, जर्मनी, जपान आदी देशांचे दौरे केले.

- मेक इन इंडिया मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन

- इंडिया मॅन्युफॅक्‍चरिंग अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला.

- 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार. 

- 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी.

- 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते

- 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड

- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री.

- 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच विधान परिषदेवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com