Ajit Pawar News: CM पदी शिंदे पण फडणविसांनी केला करेक्ट कार्यक्रम, अजित पवारांनी आकडेवारीच दाखली वाचून

maharashtra budget 2023
maharashtra budget 2023eskal
Updated on

Ajit Pawar News: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प गुरुवारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.

राज्यातील सिंचन प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या, शेकऱ्यांसाठी नवीन मोठ्या योजना चालू करणार असल्याचे सांगितले तर, मोठा घोषणा देखील करण्यात आल्या. महिलांना एसटी बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

maharashtra budget 2023
Ramesh Thorat: भाजपच्या अडचणी वाढल्या! आमदार राहुल कुल यांच्याविरोधात भाजप-राष्ट्रवादी एकत्र

या अर्थसंकल्पात भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला किती पैसे मिळाले? याची आकडेवारीच अजित पवार यांनी वाचून दाखवली. अजित पवारांनी सांगितलेल्या आकडेवारी नुसार या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री शिंदे आणि त्याच्या सहकारी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना 34 टक्के निधी देण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांना तब्बल 66 टक्के निधी देण्यात आला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

तर 'फडणवीस यांनी तुकोबांच्या ओव्यांचा आधार घेतला, त्यामुळे मी ही अर्थसंकल्पाचे तुकोबांच्या शब्दांमध्ये वर्णन करतो. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. जेवोनिया तृप्त कोण झाला? हा अर्थसंकल्प म्हणून केवळ घोषणांचा पाऊस पाडला, यातून जनतेला दिलासा मिळणार नाही,' अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

maharashtra budget 2023
Jayant Patil News: राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदे? जयंत पाटील म्हणाले...

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना निधी देत नाहीत असा अरोप केला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांना सर्वांधीक निधी दिला जातो असं शिंदे गटातील काही आमदार आणि मंत्री सांगत होते. मात्र आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून याच मुद्द्यावरून शिवसेनेला आणि एकनाथ शिंगे यांना टार्गेट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com