esakal | भाजपतर्फे सुभाष साबणे; काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर?
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra

भाजपतर्फे सुभाष साबणे; काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : मराठवाड्यातील देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप ‘पंढरपूर-मंगळवेढा पॕटर्न’ची पुनरावृत्ती करणार का, याकडे लक्ष आहे.

शिवसेनेकडून दोनवेळा निवडून आलेले सुभाष साबणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित होते. या मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. पोटनिवडणुकीत तिकीट मिळणार नाही, याची जाणीव झाल्यावर साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. तर काँग्रेसतर्फे रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जीतेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.ही निवडणूक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेनेचे साबणे भाजपचे उमेदवार

पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने विधानसभेच्या देगलूर (जि. नांदेड) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रविवारी तशी अधिकृतरित्या घोषणा केली. दरम्यान, साबणे हे सोमवारी (ता. ४) येथे होणाऱ्या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सोमवारी साबणे समर्थकांसह पक्षात प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

loading image
go to top