esakal | CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांना 'फोन टॅपिंग' प्रकरणात मुंबई पोलिसांचं समन्स
sakal

बोलून बातमी शोधा

Director of CBI: Subodh Kumar Jaiswal

CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांना 'फोन टॅपिंग' प्रकरणात मुंबई पोलिसांचं समन्स

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना समन्स बजावला आहे. पोलिसांच्या बदल्या आणि पोस्टिंगवरील महाराष्ट्र गुप्तचर विभागाचा डेटा लीक झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शनिवारी सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावले. पोलिसांनी ई-मेलद्वारे समन्स पाठवण्यात आला असून, 14 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: "...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

राज्याच्या गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी बदली पोस्टिंगमधील भ्रष्टाचाराबाबत एक गुप्तचर अहवाल तयार केला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात Official Secret Act अंतर्गत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सायबर सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे प्रकरण आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना महाराष्ट्रातील पोलिस बदल्यांमध्ये कथित भ्रष्टाचाराबद्दल तयार केलेल्या 'डेटा लीक'च्या अहवालाशी संबंधित आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे त्यावेळी पोलीस महासंचालक होते.

या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान वरिष्ठ राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आल्याचे आणि अहवाल जाणूनबुजून लीक करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र सायबर सेलने या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये शुक्ला किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही.

loading image
go to top