सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी ५० हजार शेतकऱ्यांना अनुदान देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agricultural pumps
सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी ५० हजार शेतकऱ्यांना अनुदान देणार

सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी ५० हजार शेतकऱ्यांना अनुदान देणार

पुणे - राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांना (Farmer) सौर ऊर्जेवरील (Solar Power) कृषी पंपांसाठी (Agriculture Pump) चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अभियानांतर्गत येत असलेल्या पंतप्रधान कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी याबाबतचा आपापला लाभार्थी हिस्सा भरणे अनिवार्य आहे. हा हिस्सा भरण्यासाठीची अंतिम मुदत संपली होती. परंतु यासाठी आता येत्या येत्या ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या मुदतीत ही रक्कम भरावी, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.

सौर कृषी पंप लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची रक्कम ही ऑनलाइन किंवा धनाकर्षाद्वारे (डीडी) भरणे आवश्‍यक आहे. धनाकर्षाद्वारे ही रक्कम भरावयाची असल्यास, धनाकर्षाची प्रत ई-पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. शिवाय महाऊर्जाच्या जवळच्या कार्यालयात हा धनाकर्ष जमा करावा लागणार आहे. दरम्यान, या कृषी पंपाच्या वितरणासाठीचे पुणे, नगर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, सोलापूर, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमधील उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

राज्यातील उर्वरित अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप उपलब्ध आहेत. या जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांना या कृषी पंपाच्या मागणीसाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Subsidy To 50000 Farmers For Solar Powered Agricultural Pumps

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top