पुणे : उद्धव ठाकरे गटाच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेलं. यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने यासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेल्या टीकेली भाजपनेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते पुण्यात बोलत होते. (sudhir mungantiwar attack on uddhav thackeray group)
मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेने केलेले आरोप हास्यास्पद आहे. त्यांच्या बाजूने निकाल लागला की लोकशाही जीवंत आहे आणि विरोधात आला की तिथे भाजपचा हात आहे असं म्हणतात. शिवसेना दुटप्पी भूमिकेमुळे अकुंचीत होत चालल्याचं म्हटलं.
मुनगंटीवार पुढं म्हणाले की, शिवसेनेमध्ये 'जय भवानी जय शिवाजी'चे नारे दिल्यावर तरुणांमध्ये एक उत्साह संचारतो, त्याच शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटामुळे एक निराशेचं वातावरण आहे. त्यामुळे भाजपला दोष देण्याऐवजी स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करून कार्यकर्त्यांना वेळ द्यावा. मी माझ्या पक्षाचा राजा आहे अशी भूमिका न ठेवता पक्षाच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका घेतली तर असे प्रसंग पुन्हा होणार नाहीत, असंही मनुगंटीवर यांनी नमूद केलं.
यावेळी मुनगंटीवार यांनी "माझं कुटुंब माझी जबाबदारी" न म्हणता माझा पक्ष माझी जबाबदारी म्हणायला हवं, असा खोचक टोलाही लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.