सरकारी कार्यालयात आता 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम्'; नव्या सांस्कृतीक मंत्र्यांचा निर्णय

Sudhir Mungantiwar on Ajit Pawar
Sudhir Mungantiwar on Ajit PawarSakal

मुंबई - राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असून आज खातेवाटप झालं आहे. या खातेवाटपात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राज्याच्या सांस्कृतीक मंत्रालयाचा भार सोपविण्यात आला आहे. मुनगंटीवार यांनी खातेवाटप जाहीर होताच मोठा निर्णय घेतला असून यापुढे सरकारी कार्यालयात हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे निर्देश दिले आहेत. (Sudhir Mungantiwar news in Marathi)

Sudhir Mungantiwar on Ajit Pawar
अंत्यदर्शनस्थळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सदावर्ते संतप्त; म्हणाले शरद पवार...

सध्या देशभरात स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातच सांस्कृतीक कार्यमंत्र्यांनी वंदे मातरम् म्हणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला होता. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याची टीका करण्यात येत होती. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन व्हाययला हवं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच मंत्रीमंडळाचं खातेवाटप झालं आहे. मात्र पालकमंत्र्यांची निश्चिती अद्याप झालेली नाही.

Sudhir Mungantiwar on Ajit Pawar
Cabinet Portfolio : "शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर अन् हॉटेलच!"

खातेवाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं, माहिती व जनसंपर्क विभागासह पणन, परिवहन, सामाजिक न्याय आणि विशेष सहायता असणार आहे. तर मंत्रीमंडळ विस्तारात वित्त व नियोजन आणि गृहखातं या सारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे सोपविण्यात आली आहे. राधाकृष्णविखे पाटील महसूल मंत्रालयासह त्यांच्याकडे दुग्धविकास तसेच पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतीक कार्य मंत्रालयाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयासह संसदीय कार्यमंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com