अंत्यदर्शनस्थळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सदावर्ते संतप्त; म्हणाले शरद पवार...

gunaratna sadavarte on sharad pawar
gunaratna sadavarte on sharad pawar

मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. मुंबई त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी अंत्यदर्शनासाठी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे वकील गुणरत्न सदरवर्ते देखील आले होते. मात्र यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी त्यांना सुरक्षीत बाहेर काढलं. आता यावर सदावर्ते यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

gunaratna sadavarte on sharad pawar
राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे

सदावर्ते म्हणाले की, आम्ही मेटे यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही यावेळी प्रार्थना केली. इतर आमदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, अशा प्रकराचा हल्ला माझ्यावर करण्यात आला. त्यांनंतर पोलिसांनी मला रेस्क्यू करून बाहेर काढल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. शरद पवार आणि ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी ते लोक तरुणांना हाताशी धरून अशा प्रकारचे वर्तन करायला लावतात. सर्वच मराठा तरुण यात आहेत, अस मी म्हणत नसल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं.

gunaratna sadavarte on sharad pawar
सदावर्तेंना धक्काबुक्की, मेटेंच्या अंत्यदर्शनाला पोहचले होते काळ्या कपड्यात

विनायक मेटे यांनी आयुष्यभर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी लढा दिला आहे, तर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयाच याचिका दाखल केल्या होत्या, सदावर्ते यांनी त्यांच्या भाषणातून देखील यापूर्वी अनेकदा मराठा आरक्षणाला विरोध केला होता.

दरम्यान विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मेटेंच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. दरम्यान, मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी (१५ ऑगस्ट) बीड जिल्ह्यातील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com