छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापासून 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत अंगिकारण्यात येणार

सामान्य प्रशासन विभागाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे.
Chhatrapati shivaji maharaj
Chhatrapati shivaji maharajSakal
Summary

सामान्य प्रशासन विभागाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. या जयंती दिनापासून 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत अंगिकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद क्रंमाक २ नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत अंगिकारण्यात येणार आहे.

१९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन करुन सर्व संबंधित वरीष्ठ अधिकारी आणि संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे तसेच त्यानंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे अशा सुचना जारी करण्यात आलेल्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com