सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जनतेचे प्रश्न राहिले स्वत:च्या फायदयासाठी हे सर्व सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sudhir mungantiwar

मुनगंटीवार म्हणाले, जनतेचे प्रश्न राहिले स्वत:च्या फायदयासाठी हे सर्व

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मोठा गाजावाजा करून पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेतून काहीही निघणार नाही. जनतेचे प्रश्न राहिले, स्वत:च्या फायदयासाठी हे सर्व सुरू आहे, असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

संजय राऊतांकडून (sanjay Raut) भाजपच्या साडेतीन नेत्यांचा भांडाफोड करण्यात येणार असल्याची जाहिरात कालपासून सुरू आहे. हे साडेतीन नेते अनिल देशमुख असलेल्या कारागृहात जातील आणि देशमुख बाहेर येतील असे म्हणाले होते. संजय राऊतांनी केलेले आरोप हे पोकळ वाशासारखे आहे. ज्यांनी बाळासाहेबांना आत टाकलं, त्या छगन भुजबळांना मंत्री न बनवण्यासाठीचे आदेश बाळासाहेबांनी दिले होते. मात्र, त्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून आज हे सत्तेत आहेत, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

हेही वाचा: सोने ५१ हजारांच्या उंबरठ्यावर; चार महिन्यांनंतर ५० हजारांच्या वर

भाजप (BJP) हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे फक्त महाराष्ट्रात ५६ आमदार आहेत. यापूर्वी कलमाडी, ए राजा यांच्यावरही ईडीने कारवाई केली होती. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तपास यंत्रणांना आताच दबाव वाटतो का?, असा प्रश्नही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. सत्तेत राहून किरीट सोमय्या यांना धमकी दिली जाते. यावरूनच लक्षात येत कोण धमक्या देत आहे आणि सत्तेचा चुकीचा वापर कोण करतोय, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Web Title: Sudhir Mungantiwar Sanjay Raut Bjp Is A Big Party Everything For Your Own Benefit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top