पीक विमा भरण्‍यासाठी 31ऑगस्‍टपर्यंत मुदतवाढ द्यावी, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

सुमित बागुल
Wednesday, 5 August 2020

राज्‍यात पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून 31 ऑगस्‍ट करण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे

मुंबई : राज्‍यात पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून 31 ऑगस्‍ट करण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना पात्र पाठवलंय. केवळ राज्यातील कृषिमंत्री नाही तर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना देखील सुधीर मुनगंटीवार यांनी  यासंदर्भात पत्र पाठवलं आहे.

राज्‍यात पीक विमा भरण्‍याची मुदत 31 जुलै 2020 होती. मात्र संसर्गजन्य कोरोना विषाणुच्‍या  प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे शेतकरी 31 जुलै पर्यंत पीक विमा भरू शकले नाही. सध्‍या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे.

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

त्यामुळे शेती कामात शेतकरी प्रचंड व्‍यस्‍त आहे. सोबतच राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची समस्‍या आहे, सर्व्‍हर सतत डाऊन राहत असल्‍यामुळे शेतक-यांना शेतीची कामे सोडून पीक विमा भरण्‍यासाठी जावं लागतं आणि परत यावं लागतं. यात त्‍यांच्‍या शेतीच्‍या कामांचा प्रचंड खोळंबा देखील होतो असं निरीक्षण सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं आहे.  

त्‍यामुळे पीक विमा भरण्‍याची मुदत वाढवून 31 ऑगस्‍ट 2020 करणे अत्‍यंत गरजेचे आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात  म्हटले आहे.

sudhir mungantiwar writes letter to CM thackeray in regards to crop insurance 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhir mungantiwar writes letter to CM thackeray in regards to crop insurance