Sugarcane FRP : ‘एफआरपी’ प्रकरणी १५ कारखान्यांना दणका; साखर आयुक्तालयाकडून जप्तीची नोटीस

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे.
sugarcane frp
sugarcane frpsakal
Updated on

मुंबई - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील दहा अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी दोन तसेच छत्रपती संभाजीनगरमधील एक अशा पंधरा कारखान्यांचा समावेश आहे.

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीची रक्कम ही ठरलेल्या मुदतीत देणे बंधनकारक आहे. ती न दिल्यामुळे राज्यातील १५ साखर कारखान्यांना आरआरसीची (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) नोटीस काढली आहे.

यात सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर (अक्कलकोट), गोकुळ शुगर्स लि. धोत्री, लोकमंगल अॅग्रो इंड. लि. बिबी दारफळ, लोकमंगल शुगर इथेनॉल अॅड को-जनरेशन इंड लि., भिमाशंकर शुगर मिल्स लि. पारगाव, जयहिंद शुगर्स प्रा. लि. आचेगाव, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा, सिद्धनाथ शुगर मिल्स लि. उत्तर सोलापूर, इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रा. लि., धाराशिव शुगर लि. सांगोला या दहा साखर कारखान्यांचा समावेश आहे.

तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील स्वामी समर्थ शुगर अॅड अॅग्रो इंड लि. नेवासा आणि श्री गजानन महाराज शुगर संगमनेर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि. पैठण अशा या १५ कारखान्यांकडे २४६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

आरआरसी नोटीस काढून थकबाकी वसुलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातात. ते कारखान्यांना जप्तीची नोटीस काढतात. नोटीस काढल्यानंतरही कारखान्यांनी थकबाकी न जमा केल्यास जिल्हाधिकारी कारखान्यांवर जप्तीची कारवाई करतात. कारखान्यांनी पैसे भरल्यानंतर आयुक्तालयात अर्ज करून आरआरसीची नोटीस रद्द करून घ्यावी लागते.

नवी समिती कार्यरत

राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी, अवसायानात निघालेल्या सहकारी साखर कारखाने व त्यांच्या उपांगांना भागीदारी, सहयोगी, भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठीच्या समितीची फेररचना करण्यात आली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी सहकार मंत्री राहणार असून सहकार राज्यमंत्री, सहकार विभागाचे प्रधान सचिव हे समितीचे सदस्य म्हणून तर साखर आयुक्त हे सचिव म्हणून काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com