
Mahashtra Farmers
Sakal
पुणे : आधीच दर आणि उत्पादकतेने त्रासलेल्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याना यंदा अस्मानी संकटाने चांगलेच छळले आहे. सोलापूरसह मराठवाडा, नाशिक, अहिल्यानगरच्या ऊस पट्ट्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे पीक अद्यापही पाण्यात आहे. राज्यातील विविध नदीकाठांवरील क्षेत्रात पुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे चालू हंगामात १०० लाख टन ऊस कमी मिळण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.