
पुणे : गाळप आणि साखर उत्पादनात यावर्षीचा हंगाम मागे पडला आहेच; पण त्याबरोबरच आता कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जवळपास तीनपट आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत केवळ नऊ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले होते. यावर्षी २५ कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये २१ कारखाने केवळ सोलापूर विभागातील आहेत.