वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील राहत्या घरात मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेअकराच्या सुमारास एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. ती तरुणी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती. साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५) असे मयत तरुणीचे नाव आहे.
solapur sucide

solapur sucide

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील राहत्या घरात मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेअकराच्या सुमारास एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. ती तरुणी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती. साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५) असे मयत तरुणीचे नाव आहे.

साक्षीचे वडील सुरेश मैलापुरे हे सोलापूर शहरातील महावितरणच्या कविता नगर विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सोलापुरात बदली झाल्यावर ते आयएमएस शाळेसमोर रहायला होते. त्यांची मोठी मुलगी पुण्यात मेडिकल शिक्षण घेत आहेत. लहान मुलगी, पत्नी आणि सुरेश मैलापुरे हे सोलापुरात रहायला होते. मंगळवारी (ता. ७) ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. घरात पत्नी व मुलगी दोघी होत्या. मुलीची परीक्षा सुरू असल्याने ती तिच्या खोलीत होती. अभ्यास करत असेल म्हणून तिची आई घरकामात व्यस्त होती. खूप वेळ होऊनही मुलगी खोलीबाहेर आलेली नव्हती आणि आतून काहीच आवाज देखील येत नव्हता. तिच्या आईने दरवाजा ठोठावला पण आतून काहीही आवाज आला नाही. तिच्या मोबाईलवर कॉल करूनही ती उचलत नव्हती. त्यावेळी घाबरलेल्या तिच्या आईने नातेवाइकांना व शेजारच्यांना बोलावून घेतले.

दरवाजा उघडताच साक्षीने खोलीतील पंख्याच्या हुकाला स्कार्फने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाइकांनी तिला गळफासातून सोडवून दुपारी साडेबाराच्या सुमारास बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी साक्षीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिच्या मूळ गावी जत (जि. सांगली) येथे अंत्यसंस्कार पार पडले.

पूर्वपरीक्षा संपली होती, साक्षी अभ्यासातही हुशार

दरवर्षी मुख्य परीक्षेपूर्वीची विद्यार्थ्यांची कॉलेजतर्फे पूर्वपरीक्षा दिवाळीपूर्वी घेतली जाते. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला दोनच विषय असतात, तिची पूर्व परीक्षाही सोमवारी (ता. ६) संपली होती. साक्षी अभ्यासात हुशार होती, दोन्ही वर्ष ती चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. तिने आत्महत्या का केली? हे अजूनही अस्पष्ट असून विजापूर नाका पोलिस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. त्यासाठी तिचा मोबाईल जप्त केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com