
आदित्यजी 'या' गोष्टींवर पैसे वाया घालवू नका; सुमीत राघवनने टोचले कान
राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या वेगवेळ्या आघाड्यांवर काम करताना दिसत असून, आपल्या मतदार संघाकडे त्यांचं खास लक्ष असल्याचं पाहायाला मिळतंय. यातुनच त्यांनी वरळीतीली काही ट्राफीक सिग्नलवर दृष्यमानता आणि सौंदर्य वाढवण्यासाठी विद्युत रोषणाई केली असून, त्याचे फोटो आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट आता एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे.
हेही वाचा: ''तुम्हारे हर पाप का सवाल...'' मोहित कंबोज यांचा मलिकांवर पलटवार
वरळीतील ट्राफीक सिग्नलची दृष्यमानता वाढवण्यासाठी खांबावर केलेल्या विद्युत रोषणाईचा फोटो ट्विट करत आदित्य ठाकरेंनी याची माहिती दिली. मात्र आता प्रसिद्द मराठी अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) यांनी यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. " आदित्य जी, कृपया या गोष्टींवर पैसे वाया घालवू नका. या ‘हाय व्हिजिबिलिटी सिग्नल्स’चा काही उपयोग नाही. उलट या फॅन्सी लाइट्सची देखभाल ही आणखी एक समस्या आहे." असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. कृपया वाहन चालकांना संवेदनशील करण्यासाठी चांगली योजना आणा असा सल्ला देखील दिला.
हेही वाचा: ''हॉटेल 'ललित'मध्ये अनेक गुपितं'', मलिक रविवारी कोणते खुलासे करणार?

Sumit Raghvan
सुमीत राघवन यांच्या या ट्विटमुळे या सिग्नलची मात्र चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या टीकेला आदित्य ठाकरे उत्तर देणार का हे आता पाहावं लागणार आहे.
Web Title: Sumeet Raghavan Tweet Criticize Aditya Thackeray On High Visibility Signals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..