

Sunetra Pawar first female Deputy Chief Minister Maharashtra
sakal
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. रात्री उशिरा त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्या म्हणून त्यांची उद्याच (ता.३१) निवड करण्यात येणार असून त्यानंतर राजभवनात शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी औपचारिक चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.\