BJP News : सुनील मोरे यांचा भाजपात प्रवेश; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

State President Chandrasekhar Bawankule welcoming former People Appointed Mayor Sunil More after joining BJP along with hundreds of supporters.
State President Chandrasekhar Bawankule welcoming former People Appointed Mayor Sunil More after joining BJP along with hundreds of supporters.esakal
Updated on

BJP News : थेट नगराध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही पदाची अट न घालता सुनील मोरे यांनी भाजपत पक्ष प्रवेश केला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्यानकारी योजना समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोचविण्यासाठी पक्षाच्या बागलाण तालुक्यातील सर्व जुन्या व नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सांगड घालून पक्षासाठी काम करावे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. (Sunil More entry into Bjp Party entry ceremony in Mumbai nashik news)

येथील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी मंगळवारी (ता. १८) मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. खासदार डॉ. सुभाष भामरे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, आमदार सीमा हिरे, विजय चौधरी, सुरेश निकम, सुनील गायकवाड, दादा जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुनील मोरे म्हणाले, २०१६ च्या पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरवासीयांनी थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पक्षाच्या माध्यमातून शहराचा प्रलंबित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून ५५ कोटी रुपयांची पुनद धरण पाणी योजना मार्गी लावली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

State President Chandrasekhar Bawankule welcoming former People Appointed Mayor Sunil More after joining BJP along with hundreds of supporters.
Maharashtra Politics : राज्यातल्या घडामोडींच्या मागे विनोद तावडे? स्वतः ट्वीट करत हात काढून घेतला

कोणतीही अपेक्षा न ठेवता येत्या पालिका निवडणुकीत सर्व २४ नगरसेवक निवडून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन असा विश्वासही श्री. मोरे यांनी व्यक्त केला.

सुनील मोरे यांच्यासह माजी नगरसेवक राकेश खैरनार, दिनकर सोनवणे, ॲड. दीपक सोनवने, दत्तू बैताडे, सोनाली बैताडे, निर्मला भदाने, नाना मोरकर, सुनीता मोरकर, मनोज वाघ, चेतन मोरे, श्रीकांत सोनवणे, तात्या सूर्यवंशी, आशा भामरे, सुमन पवार, विलास दंडगव्हाळ, जयश्री गरुड, हर्षवर्धन सोनवणे, मयूर सोनवणे, अनिल देवरे, पिंटू ठाणगे, लखन पवार, हरीश जाधव, सागर वाघ, संदीप खैरनार, अशोक सूर्यवंशी आदींनी प्रवेश केला. प्रवीण पवार व महेंद्र शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

State President Chandrasekhar Bawankule welcoming former People Appointed Mayor Sunil More after joining BJP along with hundreds of supporters.
Maharashtra Politics : 'राजकारणाशी संबंध नाही' म्हणत मनसे आमदाराने घातलं कोडं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com