Amit Shah : ‘भोजन भेटी’त सुटणार रायगडच्या पालक मंत्रिपदाचा तिढा? अमित शहा यांना तटकरेंच्या घरी निमंत्रण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (ता. १२) रायगडावर कार्यक्रमासाठी येणार आहेत.
Amit Shah Sunil Tatkare
Amit Shah Sunil Tatkaresakal
Updated on

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (ता.१२) रायगडावर कार्यक्रमासाठी येणार असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ‘सुतारवाडी’ या निवासस्थानी भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.या भेटीत रायगडच्या पालक मंत्रिपदाचा तिढा सोडवून घेऊन हे पद तटकरे स्वतःकडेच ठेवण्यात यशस्वी होतात का, याबद्दल औत्सुक्य आहे.

रायगडच्या पालक मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. रायगडच्या पालक मंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती केल्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त करत या पदावर दावा सांगितला होता. आंदोलन करूनही नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सध्या या जिल्ह्याचे मंत्रिपद स्थगित ठेवण्यात आले आहे.

रायगडच्या पालक मंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. पालक मंत्रिपद आमच्याकडेच राहणार असा दावा राष्ट्रवादीचे काही नेते ज्येष्ठ नेते खासगीत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com