esakal | 2024 मध्ये विदर्भात कॉंग्रेसची ताकद वाढणार I Political News
sakal

बोलून बातमी शोधा

'2024 मध्ये विदर्भात कॉंग्रेसची ताकद वाढणार'

नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात दिली आहे.

'2024 मध्ये विदर्भात कॉंग्रेसची ताकद वाढणार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूरसह पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. यात अटीतटीचे निकाल समोर येत आहेत. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नगरखेड पंचायत समितीत भाजपने बाजी मारली आहे.

हेही वाचा: नागपूरात अनिल देशमुखांना धक्का; नगरखेड पंचायत समिती भाजपकडे

यावेळी मंत्री सुनील केदार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात दिली आहे. 2024 मध्ये विदर्भात कॉंग्रेसची ताकद वाढणार असल्याची शक्यता दिसत आहे. यावेळी महाविकास आघडीला कौल दिला असून ओबीसी समाज मात्र नाराज दिसत आहे. या सगळ्यात जेव्हा केंद्राची भूमिका समोर येईल तेव्हाच राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र पक्षात कोणी काय केलं, यावर प्रदेशाध्यक्ष स्वत: बोलतील असेही ते म्हणाले आहेत.

loading image
go to top