"२०१७ मध्ये भाजप अन् राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार स्थापन झालं असतं"; तटकरेंचा गौप्यस्फोट, अजितदादांच्या टाळ्या...

Sunil Tatkare
Sunil Tatkare

Sunil Tatkare: अजित पवार गटाचे वैचारिक मंथन शिबिर कर्जत येथे होत आहे. या शिबिरात खासदार सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूमिका स्पष्ट केली. तटकरेंच्या भाषणावेळी अजित पवार यांनी देखील टाळ्या वाजवत दाद दिली. 

सुनील तटकरे म्हणाले, २०१६ मला आणि अजित पवार यांना सांगण्यात आलं. आपल्याला सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे. आज पहिल्यांदा सांगतो. त्यावेळी अजित पवार देखील सहभागी होणार नव्हतो. सात ते आठ महिने चर्चा झाली.  लोकसभेच्या जागा ठरल्या. मंत्रिपदे ठरली, खाती ठरली, पालकमंत्री पद ठरली, शेवटच्या काळाना काही कारणास्तवर ते सरकार बनलं नाही. नाहीतर २०१७ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार स्थापन झालं असतं.

Sunil Tatkare
Sunil Tatkare: "पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना..."; सुनील तटकरे यांचा मोठा खुलासा, संपूर्ण इतिहास मांडला

ते जमल नाही नाही म्हणून कर्जतला याच ठिकाणी शबीर झालं. तेथून एक दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आज त्याच ठिकाणी आपलं शिबीर आहे. घड्याळ तेच वेळ नवी या दिशेने आता आपल्याला आता पुढली वाटचाल करायची आहे, असे तटकरे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. जे सोबत नाहीत आत्ता ते देखील अजित पवार यांच्यासोबत होते.  त्यावेळी  एक पत्र तयार करण्यात आलं.  त्यामधे ठाणे,  शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्याने देखील सही केली होती, असा टोला सुनील तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला. 

Sunil Tatkare
5 राज्यांच्या निवडणुकीतील 1,452 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी; 2,371 करोडपती, 22 जणांवर खुनाचे तर 82 जणांवर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com