esakal | एकाच वर्षात दुसऱ्यांदा सूपरमून पाहण्याचा योग; पण, 'या'वेळेत असणार चंद्रग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

Supermoon

एकाच वर्षात दुसऱ्यांदा सूपरमून पाहण्याचा योग; पण, 'या'वेळेत असणार चंद्रग्रहण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एप्रिल महिन्यात विलोभनीय सुपरमून (super moon) बघितल्यानंतर आता बुद्धपोर्णिमा म्हणजेच आज पुन्हा सुपर फ्लॉवर मून (super flower moon) पाहावयास मिळणार आहे. या वर्षातील हे एकमेव खग्रास चंद्रग्रहण (lunar eclipse) अमेरिका, आस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून सुपर ब्लड मून (super blood moon) म्हणून दिसणार आहे. (super flower moon will seen today)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

आज दुपारी चंद्रग्रहणाला सुरुवात होत असल्याने भारतातून मात्र चंद्रोदय होताना ३५ मिनिटांसाठी छायाकल्प चंद्रग्रहण दिसेल. २०२१ या वर्षातील हा दुसरा सुपरमून असून या पौर्णिमेला फ्लॉवर मून असे म्हणतात. यावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर वर्षातील सर्वाधिक कमी असल्याने चंद्र १५ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसणार आहे. चंद्र आणि पृथ्वीमधील यावेळेसचे अंतर वर्षातील सर्वाधिक कमी म्हणजे ३,५७.३११ किमी असणार आहे. हे कमीतकमी अंतर ३ लाख ५६ हजार ५०० किमी तर दूरचे अंतर ४ लाख ६ हजार ७०० किमी असते, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

यापूर्वीच्या काही घटना -

चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेले दिवस

  • २६ जानेवारी १८४८,

  • नोव्हेंबर २०१६

शतकातील सर्वांत मोठे सुपरमून - ६ डिसेंबर २०५२ रो

कुठे दिसेल चंद्रग्रहण

महाराष्ट्रातून सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना छायाकल्प ग्रहणातच उगवेल आणि केवळ ३५ मिनिटाने ग्रहण सुटेल. म्हणजे ग्रहण केवळ ३५ मिनिटांसाठीच पाहता येईल. ७.२० नंतर ग्रहण राहणार नाही. मात्र, रात्रभर सुंदर सुपरमून पाहता येईल. चंद्र हा आकाराने खूप मोठा आणि तेजस्वी दिसेल.

दुर्बिणीची गरज नाही

वसंत ऋतूतील ही वैशाख पौर्णिमा असून पौर्णिमेला तो वृश्चिक राशीत असेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही. परंतु, दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहू शकतो. द्विनेत्री असेल तर उत्तम. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने सध्या कोरोना संकट आणि संचारबंदीमुळे याचा घरूनच आनंद घ्यावा.