समाजाचे प्रश्न सोडविण्यास विजयामुळे पाठबळ : मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

"आज राज्यात अनेक आंदोलने सुरू आहेत. मोर्चे सुरू आहेत. मागण्या मांडल्या जात आहेत. त्या मागण्या महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्ण आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की हे प्रश्न आता नाही. तर गेल्या 40-50 वर्षांत निर्माण होत गेले आहेत. राज्य सरकार हे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, याची जाणीव जनतेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला विजयी केले आहे.''

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई : "जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

फडणवीस म्हणाले, "आज राज्यात अनेक आंदोलने सुरू आहेत. मोर्चे सुरू आहेत. मागण्या मांडल्या जात आहेत. त्या मागण्या महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्ण आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की हे प्रश्न आता नाही. तर गेल्या 40-50 वर्षांत निर्माण होत गेले आहेत. राज्य सरकार हे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, याची जाणीव जनतेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला विजयी केले आहे.''

ते पुढे म्हणाले, "जळगावात गिरीश महाजन यांनी यशस्वी नेतृत्व केले. राजूमामा भोये आणि नाथाभाऊ खडसे यांनीदेखील खूप परिश्रम घेतले. सांगलीमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील, सांगलीचे आमदार, खासदार यांनीही परिश्रम घेतले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support by winning the solution to society says CM Fadnavis