Ajit Pawar: अजित पवारांच्या शपथविधीनंतर समर्थक 'नॉट रिचेबल'! शरद पवारांनी ५ तारखेला बोलावली बैठक

शहराध्यक्षही संभ्रमात अनिल देशमुख शरद पवारांसोबत
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री-पदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहे.

नागपुरातही अजित पवार यांचे समर्थक ‘नॉट रिचेबल’ असून काहींनी फोनवर प्रतिसाद दिला नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे नमूद केल्याने शहरातील पक्ष नेत्यांत फूट पडल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यास नागपुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारीही अपवाद नाही. शहरात अजित पवार यांचे समर्थक फारसे नसले तरी जे आहेत ते प्रभावशाली आहेत. यात प्रशांत पवार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांचा समावेश आहे.

Ajit Pawar
Nagpur: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीकडून पत्नीची डोक्यावर हातोडी मारून हत्या

अजित पवारांचे समथर्क ‘नॉट रिचेबल’!

यासंदर्भात दोघांशीही फोनवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रशांत पवार यांचा तर फोनच लागला नाही तर आभा पांडे यांनी फोन उचलण्याचीही तसदी घेतली नाही.

राजकीय भूकंपाने शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेही संभ्रमात असल्याचे दिसून आले. हरिद्वारला असून उद्या भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी नमूद केले.

दुनेश्वर पेठे यांनी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार आयोजित केला होता. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहे. आता प्रफुल्ल पटेलही अजित पवारांसोबत सामील असल्याने ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसाठी ही घटना अनपेक्षित असल्याचे दिसत आहे. अचानक उद्‍भवलेल्या या परिस्थितीमुळे अनेकांना बोलणेही अवघड झाले आहे.

त्यातच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनीही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

उद्या शहर राष्ट्रवादीची बैठक

शरद पवार यांनी ५ तारखेला बोलावलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी ४ जुलैला बैठक आयोजित केली आहे. सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Ajit Pawar
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर सुविधांचा अभाव! दोनशे किमीमध्ये नाही अग्निशमन केंद्र; वाहन जळाल्यास प्रवाशांचा मृत्यू अटळ

गणितच बिघडले

पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्व नागपूर मतदारसंघावर दावा करण्याचे ठरविले होते.

तसा प्रयत्न पूर्व नागपुरातील नेत्यांचा सुरू होता. परंतु आता अजित पवार भाजप व शिंदे गटासोबत गेल्याने या मतदारसंघातून इच्छुकांचे गणितच बघिडल्याचे चित्र आहे.

५ तारखेला पदाधिकाऱ्यांची बैठक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची ५ जुलैला मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी नागपुरातून कोण जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com