Shivsena: धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात निकाल; सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात निकाल; सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण

Shivsena: धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात निकाल; सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून आज एक महत्त्वपूर्ण निर्णयही समोर येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पाहता येणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE होणार आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालय लाईव्ह सुनावणी होणार आहे.

खरी शिवसेना आमची, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर आधी आमदारांच्या अपात्रतेसंबधी निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद शिवसेनेने सुप्रीम कोर्टात केला होता. दरम्यान, या सगळ्या युक्तिवादानंतर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद केला जाईल त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत म्हटलं होतं.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप करत एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंड पुकारलं होतं. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आले होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली.