"देवेंद्रजी आपसे ये उम्मीद न थी"; सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांना करून दिली कर्तव्याची आठवण | Supriya Sule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya sule criticize devendra fadanvis

"देवेंद्रजी आपसे ये उम्मीद न थी"; सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांना करून दिली कर्तव्याची आठवण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट रचल्याचा आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.तेव्हाचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी हे आरोप फेटाळून लावले.

दरम्यान आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे. (Supriya sule criticize devendra fadanvis)

पुण्यात माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे हास्यास्पद आहे. देवेंद्रजी आपसे ये उम्मीद नही थी.

मला देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या. मला असं वाटलं होतं की त्यांनी अशा खोट्या-नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यामध्ये जी कोयता गँग चाललीय, धायरीत काही लोकांनी पिस्तुली काढल्या यानंतर प्रशासन आणि सुरक्षा आणि सरंक्षण या विषयावर गृहमंत्री म्हणून बोलावं ही माझी अपेक्षा होती.

हेही वाचा: Padm Awards 2023 : झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री

त्यांनी कुठलं काय काढलंय त्यांनाच माहिती. त्यांना विनंती आहे की पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण झाला आहे.तुमच्या कडे गृहमंत्रालयाचा रिपोर्ट देखील येत असेल. सगळीकडे क्राइम वाढतोय असे डेटा सांगतोय. अशा परिस्थितीत राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रश्नांवर बोलावं ही आमची अपेक्षा होती असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा: Prakash Ambedkar : ...तर वंचित अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होईल; प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान

महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) अडीच वर्षांच्या कालावधीत माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते.

कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा असे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांना देण्यात आले होते असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.