esakal | सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule post photo on Facebook with Sharad pawar

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी वडिल शरद पवार यांच्यावर आज फेसबुकवर भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी.....! लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी....!' अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी वडिल शरद पवार यांच्यावर आज फेसबुकवर भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी.....! लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी....!' अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आज (ता.०३) पोस्ट केलेली कविता त्यांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोप सभेत म्हटली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. या त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा प्रयत्नेदखिल केला होता. या सर्व संघर्षमय काळात मोठ्या ताकदीने त्या वडील शरद पवार यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या पाहायाला मिळाल्या. यातच त्यांनी आज केलेली पोस्ट ही अत्यंत सूचक वाटते. 

महेंद्र सिंह धोनीला मोठा झटका; गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपासून राज्यात सत्तांतर करण्यासाठी शरद पवार यांनी मोठे प्रयत्न करून सत्तांतर घडवून आणले. मोठ्या घडामोडीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना यश आले. या तीन पक्षांची मोट बांधून राज्यात सत्ता स्थापन करण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. या काळात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला असला त्यांच्या कन्या सुप्रिया या कायम त्यांच्यासोबत होत्या.

loading image
go to top