esakal | महेंद्र सिंह धोनीला मोठा झटका; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

fir filed against ms dhoni in amrapali case

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धोनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्रापाली समुहाच्या वादात पुन्हा एकदा धोनीचे नाव समोर आले आहे. मात्र आता धोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळं त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

महेंद्र सिंह धोनीला मोठा झटका; गुन्हा दाखल

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धोनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्रापाली समुहाच्या वादात पुन्हा एकदा धोनीचे नाव समोर आले आहे. मात्र आता धोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळं त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

27 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एफआयर दाखल केली असून यात धोनीचेही नाव समोर आले आहे. 2003मध्ये आम्रपाली समुहानं लोकांकडून पैसे घेऊन त्यांना घर दिले नव्हते. त्यामुळं या कंपनीवर 42 हजार घरे बुडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्यात या समुहानं चक्क 2 हजार 647 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. मुख्य म्हणजे आम्रपाली समुहाचा ब्रँड अँबेसडर धोनी होता, म्हणून गुन्ह्यात त्याचेही नाव घेण्यात आले आहे.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार आम्रपाली समुहानं 6 कोटी 52 लाख रुपये रिती स्पोर्ट्स प्रा. लि. कंपनीत बेकायदेशीरपणे वळवले. दरम्यान, या कंपनीचे सर्वात जास्त शेअरर्स हे धोनीच्या नावावर आहेत. आम्रपाली समुहानं रिती स्पोर्ट्स कंपनीत पैसे गुंतवण्याआधी एक करार केला होता. यात ही कंपनी धोनीला तीन दिवसांसाठी आम्रपाली कंपनीच्या कार्यक्रमासाठी तयार करेल. दरम्यान त्यानंतर या समुहानं धोनीला आपल्या कंपनीचे ब्रँडअँबेसडर केले होते.

पानिपतच्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, 27 नोव्हेंबरला धोनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोनीवर घर खरेदी करणाऱ्यांनी आरोप केला आहे. आरोपपत्रात धोनीनं आम्रपाली ग्रुपची जाहीरात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं आरोपींच्या लिस्टमध्ये धोनीचे नाव समोर आले आहे.