लोकसभेतील चर्चा गाजविणारे 'हे' आहेत महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह खासदार! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

लोकसभेत देशातील समस्यांवर चर्चेतून थेट कामकाजात सहभागी होणारे महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, विनायक राऊत हे खासदार अव्वल ठरले आहेत. त्यात शिवसेनेच्या चार वाघांचा समावेश आहे.

पुणे - लोकसभेत देशातील समस्यांवर चर्चेतून थेट कामकाजात सहभागी होणारे महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, विनायक राऊत हे खासदार अव्वल ठरले आहेत. त्यात शिवसेनेच्या चार खासदारांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लोकसभेतील चर्चेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 97 वेळा सहभाग घेतला आहे. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी 53 वेळा, कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 49 वेळा तर, पुणे जिल्ह्यातील मावळचे शिवसेनेचे खासदार  श्रीरंग बारणे यांनी 48 वेळा सहभाग घेतला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 46 वेळा चर्चेत भाग घेतला आहे. महाराष्ट्रातील टॉप फाईव्हमध्ये राष्ट्रवादी टॉपला तर, उर्वरित चार शिवसेनेचे खासदार आहेत. भाजपचा एकही खासदाराचा यामध्ये समावेश नाही.
--------
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
--------
सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट
--------
पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट
---------- 

गोपाळ शेट्टी देशात प्रथम 
कसभेत स्वतंत्र आणि खासगी विधेयके मांडणाऱया देशातील खासदारांत भाजपचे मुंबईतील गोपाळ शेट्टी हे अव्वल ठरले आहेत. त्यांनी 9 विधेयके मांडली आहेत. तर, राज्यांतील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 5, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळे यांनी प्रत्येकी 4 विधेयके मांडली आहेत.  

पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती सोमवारी सकाळी दिली. लोकसभेतील अपडेटसची 31 मे पर्यंतची दखल संस्थेने घेतली आहे, अशी माहिती परिवर्तनच्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule Rahul Shewale Dr. Shrikant Shinde Shrirang Barne Vinayak Raut are the top five MPs in Maharashtra