गॅस सिलिंडरच्या किमतीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, 'हा निवडणुक जुमला, काँग्रेसच्या काळात ४०० रुपयांना सिलिंडर होता'

LPG Cylinder Price: सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
mp Supriya Sule
mp Supriya Sulesakal
Updated on

Supriya Sule on LPG Price:नुकतीचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रक्षाबंधन आणि ओनमचे औचित्य साधत देशातील भगिनींसाठी घरघुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये २०० रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत असणाऱ्या सिलिंडरवर ४०० रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे.

सरकारच्या या निर्णयाबद्दल अनेक नेत्यांनी मोदींची पाठ थोपटली. देवेंद्र फडणवीसांनीही मोदींचे तोंडभरुन कौतुक केले. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळेंनी सरकारच्या या निर्णयाला निवडणुकीचा जुमला म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळातील गॅस सिलिंडरची किंमत आणि सध्याच्या किमतीमधील फरक बोलून दाखवला. गॅस सिलिंडरची किंमत कमीत कमी ५०० ते ७०० रुपयांनी कमी केली पाहिजे होती, असे मतही त्यांनी मांडले.

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेल्या कपातीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हे 'जुमला' सरकार आहे. २०० रुपये कमी करून काय होणार आहे? आमचं सरकार सत्तेत असताना, 400 रुपये प्रति सिलिंडरचे दर होते. आज ते 1150 रुपये आहे. त्यांनी 500 रुपये किंवा 700 रुपयांनी भाव कमी करायला हवे होते. हा सगळा निवडणूक 'जुमला' आहे. महागाईचा विचार त्यांनी केला नाही. साडेचार वर्ष महागाई आणि बेरोजगारीमुळे कर्नाटकच्या लोकांनी त्यांना नाकारले. त्यामुळे केंद्र सरकार घाबरले आहे."(Latest Marathi News)

mp Supriya Sule
Rohini Khadse: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची वर्णी; पवारांच्या उपस्थितीत नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रक्षाबंधन आणि ओनम या सणांनिमित्त देशातील भगिनींसाठी गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती. घरघुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपयांनी कपात करण्यात आली होती आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरवर ४०० रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा करण्यात आली. ( Latest Marathi News)

mp Supriya Sule
Sharad Pawar on Bhujbal: टीकेनंतर शरद पवार पहिल्यांदाच भुजबळांवर बोलले; म्हणाले, तेव्हा राजीनामा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com