Supriya Sule: रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयापर्यंत स्वतः सुप्रिया सुळेंनी दिली साथ; म्हणाल्या, 'माझा ईडीवर पूर्ण विश्वास..'

Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आम्ही चौकशीला पुर्णपणे सहकार्य करणार आहोत असं म्हटलं आहे.
Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry
Supriya Sule on Rohit Pawar ED EnquiryEsakal

बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून आज चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी विधानभवनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यानंतर शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन ते ईडी कार्यालयाकडे गेले. त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यांनी रोहित पवारांना यावेळी संविधानाची प्रत देखील भेट दिली. रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आम्ही चौकशीला पुर्णपणे सहकार्य करणार आहोत असं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना सप्रिया सुळे म्हणाल्या, 'सत्यमेव जयते. विजय हा सत्याचाच होईल. हा काळ संघर्षाचा आहे. आव्हान येत आहेत पण, आव्हानांवर मात करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो. रोहित पवारांना नोटीस येणं ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. शेतकरी, कष्टकरी, शोषित, विद्यार्थी यांच्यासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई होत आहे, सुडाचे राजकारण केले जात आहे अशी चर्चा अनेकदा माझ्या कानावर आल्या आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry
Anil Deshmukh: शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांवर कारवाई होतेय का? अनिल देशमुख म्हणाले...

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, "केंद्राच्या एका अधिकृत डेटानुसार इनकम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या 90 टक्के केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आहे. रोहित पवारांनी संघर्षयात्रा काढली होती. कदाचित हे त्याचंच सूडाचं राजकारण असू शकतं. हे शक्तीप्रदर्शन नाही. यात प्रेम आणि नाती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांच्या भावासाठी इथे यावंसं वाटतंय. आम्ही काही चूक केली नसेल, तर तपासाच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही".

पुढे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे म्हणाल्या, "चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की ते रोहितची बाजू ऐकतील. आम्ही चौकशीला पुर्णपणे सहकार्य करणार आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही."

Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry
Rohit Pawar: ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी रोहित पवार काय म्हणाले? अजित पवारांनाही लगावला टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com