"कोणाच्या वडिलांच्या.."; केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

"कोणाच्या वडिलांच्या.."; केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीला १८ मे पर्यंत कोठडी सुनीवण्यात आली आहे. तसेच नाशिकच्या एका तरूणाने शरद पवार यांच्याबद्दल निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं, या दोन्ही प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ट्रोलींग हा विषय वेगळा आहे, काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहीलं आहे, ते कायद्यात बसत नाही, जे झालं ते दुर्दैवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. केतकी चितळे यांच्या पोस्टनंतर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवर टीका केली होती, यामध्ये देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समावेश आहे.

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणाच्याही वडिलांच्या मृत्यूची इच्छा करणं गैर आहे, हे कोणत्या संस्कृतीत बसतं. या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. ही कृती आहे त्यावर सातत्य ठेवलं पाहीजे ही मराठी संस्कृती आहे. ही वेळ उद्या कोणावरही येऊ शकते, तुमच्यावर वेळ आली तर मी देखील उभी राहीन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा: केतकी चितळे मनोरुग्ण, तिला येतो झटका किशोरी पेडणेकर संतापल्या

केतकी चितळेला ओळखत नाही, असे सांगत केतकी चितळे यांनी मी पोस्ट डिलीट करणार नाही या वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तो त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे, देशामध्ये यंत्रणा तेथे जाऊन प्रत्येकानं न्याय मागावा, माध्यम त्यासाठीची जागा नाही. कोणी मरावं असे, अपशब्द काढणं माझ्या संस्कृतीत बसत नाही, माझ्या वडिलांवर ५५ वर्षात इतके हल्ले झाले, त्यांनी कोणाविरोधात शब्द काढला नाही, ही आमची मराठी संस्कृती आहे, ज्याचा आम्हाला आभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंकडून तीव्र शब्दात निषेध

सुषमा स्वराज यांची आठवण काढत सुप्रिया सुळे महागाही ही कुठल्याही प्रश्नापेक्षा सगळं राजकारण बाजूला ठेवून तातडीने मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी आणि महागाईवर राज्य आणि केंद्राने मिळून तो़डगा काढावा अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच नात्यामध्ये भांड्याला भांड लागतंच, या प्रेमाच्या गोष्टी असतात. थोडंस भांड्याला भांड लागणं चांगलं असतं, त्यामुळं नातं घट्ट होतं असं कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत वादावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणाले, टिका करताना भाषेचे भान राखले पाहिजे

Web Title: Supriya Sule Reaction On Ketaki Chitale Comment On Ncp Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supriya SuleSharad Pawar
go to top