Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीही नवीन नाही : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

'आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात काहीही नवीन नाही. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेलाही पुरेसे अनुदान का दिले जात नाही,' असा सवाल सुळेंनी केला.

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत आज (ता. 1) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही निर्णय हे स्वागतार्ह असले, तरी काही निर्णयांवर मोदी सरकारवर टीका होत आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष अशा काहीच तरतूदी नाहीत, मागील वर्षी महिलांबाबत ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्याच याही वेळी जाहीर करण्यात आल्या आहेत, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले.

Budget 2020 : बजेटमध्ये तेच ते आणि तेच ते; राहुल गांधींची टीका

'आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात काहीही नवीन नाही. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेलाही पुरेसे अनुदान का दिले जात नाही,' असा सवाल सुळेंनी केला. महिलांसाठी काहीही नवीन तरतूदी केलेल्या नसून, यो अर्थसंकल्पात तोचतोचपणा येत होता असे म्हणत त्यांनी अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही हा अर्थसंकल्प अपेक्षापूर्ती करणारा नाही, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेल्या देशात अर्थव्यवस्थेचे मोजमाप व्यवस्थित केले जात नाही, असाही आरोप त्यांनी केला.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule reacts on Budget 2020