

Supriya Sule Pushes For Sharad Pawar Rajya Sabha Nomination
Esakal
Rajya Sabha Equation Shifts In Maharashtra Politics राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची सर्वांची इच्छा असल्याचं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. यासंदर्भात संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्या म्हणाल्या. सध्या शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यात आहेत. आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवार घरी परतणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला ६ तर महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.